*खासदार अशोक नते यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट*
*रुग्णांच्या समस्यांसंदर्भात घेतला आढावा…*
दि.२५ मे २०२४
गडचिरोली : खासदार अशोक नेते यांनी शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी रुग्णालयातील डॅाक्टरांसोबत चर्चा करून सुविधांचा आढावा घेत काही सूचना केल्या.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य रविंद्र ओल्लालवार यांच्या सासूबाई जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असल्याने यासंबंधिची माहीती मिळाल्यावर खा.नेते यांनी रुग्णालयाला भेट देऊन भरती असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी संपूर्ण वॅार्डात फिरुन रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. काही रुग्णांना सांगितलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याची सूचना त्यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना केली. गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील कामांचीही त्यांनी माहिती जाणून घेत यासंदर्भातील प्रशासकीय कामांना गती देण्याची सूचना खा.नेते यांनी केली.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर, डॉ.मनिष मेश्राम, डॉ. राहुल धाडसे,तालुका महामंत्री बंडूजी झाडे,पत्रकार कैलास शर्मा,तुळशीदास नैताम,श्रीधर पेशटीवार, तसेच मोठया संख्येनी रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक नागरिक उपस्थित होते.