*११ जुन रोजी वादळी पावसाने छत हिरवले!*
*छगन शेडमाकेंनी अस्मानी संकटात सापडलेल्या कुटुंबाला सावरले*
देसाईगंज-
तालुक्यातील अनेक गावांत ११ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने अनेकांच्या डोक्यावरचे छत हिरावले. याबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कामगार कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मोका चौकशी करून अस्मानी संकटात सापडलेल्या अतिशय हलाखीचे जीवन जगत असलेल्या कुटंबियांच्या डोक्यावरील छत टाकुन देत कुटुंबीयांना सावरल्याने परिसरात शेडमाके एकच चर्चेचा विषय ठरू लागले आहेत.
देसाईगंज तालुक्यातील चिखली(रिठ)येथील विनोद विठ्ठल दुमाने या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या गरीबाचे ११ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने छत हिरावले. घरावरील संपुर्ण कवेलु उडाल्याने दुमाने कुटुंबियांना रात्र काढण्यासाठी दुसऱ्याच्या घराचा आधार घ्यावा लागला. देसाईगंज तालुक्यात विहीरगाव,पिंपळगाव,चिखली (रिठ)या परिसरातील घरांना वादळी वाऱ्यासह पावसाचा जबर तडाखा बसल्याचे निदर्शनास येताच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या गावांकडे धाव घेऊन मोका चौकशी केली मात्र ठोस उपाययोजनेवर भर दिला नसल्याने राहायचे कुठे?असा गंभीर प्रश्न दुमाने कुटुंबीयांसमोर उभा ठाकला होता.
दरम्यान देसाईगंज तहसील कार्यालयाच्या वतिने मोका चौकशी करून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.मात्र दुमाने कुटुंबियांना पर्यायी व्यवस्था होईस्तोवर दुसऱ्याच्या घराचा आधार घेऊन राहावे लागेल,ही बाब गडचिरोली जिल्हा काँग्रेस कामगार कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली. चौकशीत सदर कुटुंब अतिशय हलाखीचे जीवन जगत असल्याचे निदर्शनास येताच शेडमाके यांनी तत्काळ घरावर छत टाकुन देण्याची संपुर्ण व्यवस्था करून दिली.यामुळे शेडमाके परिसरात एकच चर्चेचा विषय ठरू लागले असुन नैसर्गिक आपत्तीत मदतीला धावून आल्याने भारावलेल्या कुटुंबियांनी शेडमाके यांचे आभार व्यक्त केले.यावेळी विनोद दुमाने, वत्सलाबाई पर्वते,बळीराम बादशाह,भुमेश शिंगाडे, हरिदास बगमारे,अजय मेश्राम आदी चिखली येथील नागरिक उपस्थित होते.
*शेडमाकेंनी यापूर्वीही अनेकांना केली मदत*
कुठलाही राजकीय वारसा लाभला नसलेले छगन शेडमाके सामाजिक बांधिलकी जोपासण्यात सदैव अग्रेसर राहात असुन त्यांनी यापुर्वी अनेकांना नगद रोख रक्कम आर्थिक मदत देऊन नैसर्गिक संकटात धाऊन जाण्यात मौलिक भुमिका बजावली आहे.समाज व्यवस्था बळकट करण्यात काँग्रेसच सक्षम असल्याचा ठाम विश्वास असल्याने पक्षाची विचारधारा सोबतीला घेऊन शेडमाके आपली जबाबदारी ओळखून अनेकांना मदतीचा हात देत आहेत.त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.