गडचिरोली पोलीस दल द्वारा पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

24

 

गडचिरोली पोलीस दल द्वारा पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 

# पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय, सिरोंचा येथे झालेल्या शिबिरात एकुण 560 रक्तदात्यांनी केले रक्तदान

# रक्तदानामध्ये 50 हुन अधिक महिलांचा उत्स्फुर्त सहभाग

# पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांनी रक्तदान करुन वाढविला रक्तदात्यांचा उत्साह

 

रक्तगटाचा शोध लावणारे ऑस्ट्रीयन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांच्या जयंतीनिमित्त सन 2004 पासुन 14 जुन हा दिवस जगभरात रक्त आणि रक्तांची आवश्यकता, त्याची मागणी व त्याचा गरजेबद्दल जागरुता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन म्हणुन साजरा केला जातो. यादिनाचे औचित्य साधुन गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील पांडु आलाम सभागृहामध्ये तसेच उप-मुख्यालय प्राणहिता व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. संदेश नाईक सा., उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजणकर सा., तसेच विविध शासकिय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ, एसआरपीएफचे पोलीस अधिकारी व अंमलदार, यासोबतच पोस्टे/उप-पोस्टे/पोमकें स्तरावरुन आलेल्या नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवुन “रक्तदान हेच श्रेष्ठदान” ही सामाजिक भावना उराशी बाळगुन एकुण 560 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यासोबतच रक्तदान शिबिरादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी रक्तदानाचे महत्व पटवून सांगीतले की, मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे. एवढेच नव्हे तर रक्तदाता म्हणुन सहभागी होवुन आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घेणेबाबत त्यांनी आवाहन केले. रक्तदान केल्याने त्या रक्ताचा उपयोग होवुन एखादया रुग्णाचा जीव वाचविल्याचे व मदत केल्याचे आपणास समाधान मिळते.

सदर आयोजित रक्तदान शिबिरात मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., तसेच सीआरपीएफचे डेप्युटी कमांडण्ट 192 बटा. श्री. शिव महेन्द्र सिंग., अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली श्री. डॉ. सतिशकुमार एम. सोळंके सा. व मुख्य वैदयकिय अधिकारी पोलीस रुग्णालय गडचिरोली श्री. सुनिल मडावी हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उप-पोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि नरेन्द्र पिवाल व प्रोपागंडा व जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि शिवराज लोखंडे व सर्व अंमलदार तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संपुर्ण टिमने अथक परिश्रम घेतले.