राजसाहेब ठाकरे यांचा सुधारीत गडचिरोली दौरा २२ ऑगस्ट ला!

65

राजसाहेब ठाकरे यांचा सुधारीत गडचिरोली दौरा २२ ऑगस्ट ला!

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे येत्या २० ऑगस्ट पासून विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत.मराठवाड्यातील पहिल्या टप्प्यातील दौरा आटपून व विधानसभेसाठी चार उमेदवारांची घोषणा करून येत्या दुसऱ्या टप्प्यातील विदर्भ दौऱ्यात विदर्भातील काही विधानसभा उमेदवारांची घोषणा करण्याचे संकेत आहेत.२० ते २१ ऑगस्ट गोंदिया,भंडारा दौऱ्या नंतर राजसाहेब ठाकरे यांच्या “नवनिर्माण यात्रेचे” आगमन २२ तारिख गुरूवार ला सकाळी १०:०० वा इंदिरा गांधी चौक येथे होणार आहे.स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पाडून शासकीय विश्रामगृह(कॉम्प्लेक्स)इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निरीक्षक व पदाधिकारी यांची आढावा बैठक व नवीन कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश पार पडणार आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा गडचिरोलीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत पक्षप्रमुखांच्या दौऱ्यामुळे पक्षाला नवी उभारणी मिळणार आहे…