*_भाजपा ची विधानसभा विजय संकल्प बैठक संपन्न.._*

29

*_भाजपा ची विधानसभा विजय संकल्प बैठक संपन्न.._*

 

*_भाजपाचा विजयी संकल्प करण्यासाठी विस्तारक,बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला लागावे असे या बैठकीत दरम्यान मा.खा.अशोकजी नेते यांचे मार्गदर्शक प्रतिपादन.._*

 

दिनांक.२१ आक्टोंबर २०२४

 

गडचिरोली :- माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील निवासी कार्यालयात भाजपा विधानसभेची विस्तृत बैठक आयोजित करण्यात आली.

 

या प्रसंगी वीर बाबुरावजी शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त मान्यवरांनी प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करत अमर रहे, अमर रहे असा जयघोष केला.

 

यावेळी मंचावर प्रामुख्याने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोकजी नेते, मध्यप्रदेश पूर्व अध्यक्ष युवा आयोगाचे मान.श्री.डॉ. निशांतजी खरे,महाराष्ट्र संघटक अनु.जनजाती मोर्चाचे मान.श्री. किशोरजी काळकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,मध्यप्रदेशचे पंकजजी टेकाम,जेष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव जी कोहळे,किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,लोकसभा विस्तारक प्रमोद जी पिपरे,या बैठकीचे संचालन जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे,जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महाराष्ट्र एस.टी.मोर्चाचे सोशल मीडिया प्रमुख अक्षयजी उईके,तसेच विस्तारक व मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

 

या बैठकीचे समारोप करतांना माजी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना म्हणाले केंद्र व राज्य सरकार दीन दलीत शोषित, पिढीत, वंचित,सामान्य अशा घटकापर्यंत अनेक शासनाच्या योजना पोहोचण्याचा काम केल. तसेच सरकार महिला सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध आहे. या महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. भाजपा शासित मध्य प्रदेश मध्ये ही योजना सुरूवातीपासूनच अखंडितपणे सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने देखील ही योजना लागू केली आहे..

प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गडचिरोली,चामोर्शी, धानोरा येथे

मोफत अर्ज भरण्यासाठी आपण सुविधा उपलब्ध करून दिले.व या माध्यमातून विविध शिबिरांचे आयोजन करत विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिला भगिनींना मिळालेला आहे याचे समाधान वाटते..

प्रत्येक कार्यकर्ता बुथावर जाऊन काम करावे बुथ जितो चुनाव जितो यानुसार विजयाचा शिल्पकार हा बुथ प्रमुख असतो.येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच भाजपा विजय होईल असा विश्वास करतो.

शासनाच्या जन कल्याणकारी योजना घराघरातपर्यंत पोहोचवून या शासनाच्या अनेक योजनेची माहीती जनतेपर्यंत द्यावी. भाजपाचा विजयी संकल्प करण्यासाठी विस्तारक, बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला लागावे असे या बैठकीत दरम्यान विस्तृत मार्गदर्शन मा.खा.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोकजी नेते यांनी केले.

 

या बैठकीत मध्यप्रदेश पूर्व अध्यक्ष युवा आयोगाचे डॉक्टर मान.श्री. निशांतजी खरे यांनी केंद्र शासनाच्या योजना व राज्य शासनाच्या योजना यावर विस्तृत मार्गदर्शन करत विधानसभेच्या निवडणुकीत विजयाचा शंखनाद फुंकत कार्यकर्ते यांनी कामाला लागावे असे सविस्तर मार्गदर्शन केले.