*बुद्धांचे आचार,विचार अंगीकृत करून आचरणात आणावे:- इंजि. प्रमोदजी पिपरे*
*संबोधी बुद्ध विहार संघर्ष नगर येथे बुद्ध जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन*
*गडचिरोली दि.१ मे 2026*
*संपूर्ण विश्वाला दया,क्षमा, शांतीची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्धाचे सर्वांनी आचार,विचार अंगीकृत करून आचरणात आणावे,असे प्रतिपादन इंजि. प्रमोदजी पिपरे संचालक महाराष्ट्र सहकारी संघ मर्या. पुणे तथा माजी सभापति नप गडचिरोली यांनी केले.*
*संबोधी बुद्ध विहार संघर्ष नगर येथे बुद्ध जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.*
*सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*
*कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संबोधी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष डॉ.योगीराज कराडे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सो.योगिताताई पिपरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी (माजी नगराध्यक्ष) तथा नगरसेविका नप गडचिरोली, श्री.बाळूभाऊ टेंभुर्णे नगरसेवक नप गडचिरोली, श्री.केशवजी भालेराव, सुमनताई कराडे महिला मंडळ अध्यक्ष, प्रा. डांगे सर,श्री.डोंगरे सर,श्री. संजय खांडरे,श्री. संजय बोधलकर तसेच संघर्ष नगर येथील नागरिक,महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे आयोजन संबोधी बुद्ध विहार समिती, संबोधि बुद्ध विहार महिला मंडळ आणि समस्त बौद्ध समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आले.*







