Home Breaking News *_मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात धान्य व्यापारी बैठक संपन्न_*

*_मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात धान्य व्यापारी बैठक संपन्न_*

84

*_मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात धान्य व्यापारी बैठक संपन्न_*

दिं.११ नोव्हेंबर २०२४

गडचिरोली : मा.खा.तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात गडचिरोली परिसरातील लक्ष्मी राईस मिल, शिवणी येथे धान्य व्यापार्‍यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपले विचार मांडले व व्यापार करतांना व्यापाऱ्यांच्या येणाऱ्या अडी अडचणी आणि अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

 

जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत धान्य व्यापारी रमेशजी सारडा, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी भुरसे, नंदुजी काबरा, प्रवासी कार्यकर्ता विनिता कुलस्ते, कौरचाताई,प्रकाश निकुरे तसेच मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग सहभागी झाला होता.

 

बैठकीत व्यापाऱ्यांच्या समस्या, व्यापार धोरणे आणि नवीन नियमांवर सखोल चर्चा झाली. व्यापार्‍यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि व्यवसायवृद्धी करण्यासाठी काही उपाययोजना व धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

Don`t copy text!