*जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव त्रृटी पुर्ततेसाठी विशेष मोहीम*
गडचिरोली,दि.14: सन 2024-25 या सत्रामध्ये अनु.जाती, इमाव, एसईबीसी व इतर राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी इच्छूकांनी अर्जदारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी समिती, गडचिरोली या कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव दाखल करून पावतीच्या आधारे प्रवेश निश्चित केलेल्या अर्जदारांना अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या सर्व अर्जदारांसाठी दिनांक 14.11.2024 ते 28.11.2024 या कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
समिती कार्यालयात चौकशी कक्षामध्ये विशेष त्रृटी पुर्तता मोहीम कक्ष तयार करण्यात आले आहे. अर्जदार विद्यार्थांना याआधी समितीकडून पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या त्रृटीची पुर्तता करण्यासाठी आपल्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची पावती, तसेच जाती दावा सिध्द करण्याऱ्या महसुली, तसेच शालेय सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित राहून, आपल्या प्रकरणाची त्रृटीची पुर्तता करावी याबाबत कळविण्यात येवून त्रृटीची पुर्तता करण्यात आले. तसेच त्रृटीची पुर्तता केलेल्या प्रकरणावर समितीकडून तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्यात आले आहे. परंतु अर्जदाराने त्रृटीची पुर्तता न केलेले प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा सर्व अर्जदारांनी दिनांक 27.11.2024 रोजी त्रृटींची पुर्तता करण्यासाठी”विशेष मोहीमे”आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व दस्ताऐवजाच्या छायांकित व मुळ प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकिय आय.टी.आय.चौक, एल.आय.सी. रस्ता,कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे. त्रृटी अभावी प्रकरण प्रलंबित राहिल्यास वा प्रवेश रद्द झाल्यास त्यास अर्जदार स्वत: जबाबदार राहील याची दक्षता घ्यावी, असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे.
0000