माहिती अधिकार कायद्याची प्रशासनाकडून अवहेलना

140

माहिती अधिकार कायद्याची प्रशासनाकडून अवहेलना

 

 

माहिती अधिकार पत्रकार सरंक्षण समितीच्या पाहणीत अधिकाऱ्यांची पोलखोल

 

दिं: 10/01/2025

 

गडचिरोली :प्रशासन पारदर्शक व्हावे. नागरिकांना प्रशासनाच्या कामांची माहिती मिळावी. सोबतच माहिती दडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक बसावा यासाठी राज्यात माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला. पण गडचिरोली जिल्ह्यात या अधिकाराची पूरती वाट लागली आहे. माहिती अधिकार,पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे यांनी नुकतीच एटापल्ली भेट देऊन पाहणी केली असता हा प्रकार समोर आला.यानंतर आता संघटनेने प्रशासनाला निवेदन देत या कायद्याची काटेखोर पद्धतीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

 

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा दि.१२/१०/२००५ पासून अंमलात आला आहे हा अधिनियम अंमलात आल्यापासून १२० दिवसांच्या आत १७ बाबीवरील माहिती तयार करुन तो प्रसिध्द करावे तसे सर्व सार्वजनिक प्राधिकरणाना शासनाणी आदेश दिले होते, माहितीचा अधिकार कायदा अंमलात येऊन कितेक वर्ष झाले तथापि तहसील कार्यालय एट्टापल्ली जिल्हा गडचिरोली येथील कार्यालयात अजूनही माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गतचे फलक सुद्धा लावले नाही असे माहिती अधिकार व पत्रकार सरक्षण समितिच्या जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांनी तहसील कार्यालय एट्टापल्ली येथे भेट देता निदर्शनात आले संपूर्ण तहसील कार्यालय एट्टापल्ली पाहणी केली असता माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गतचे फलक दिसले नाही या विषयावर तहसिलदार यांच्या सोबत चर्चा करण्याचे ठरवले असता ते मीटिंग ला गेले होते अशी माहिती मिळाली, कार्यालयामध्ये दुसरे कोणीहि अधिकारी उपस्थित नवते , अखेरीस सायंकाळी 4 च्या सुमारास नायब तहसिलदार श्री. ए. बी. भांडेकर आले त्यांच्या सोबत या विषयी चर्चा केली असता ही तहसील कार्यालयाची ईमारात नविन आहे सुरवातीला जुन्या कार्यालयात फलक होता पण नविन ईमारतिचे काम करत असताना फलक कुठे तरी ठेवला असेल तो शोधून लवकरात लवकरात लावण्याचा प्रयत्न करतो किव्हा नविनच फलक तयार करून लावतोय असे उत्तर दिले तहसील कार्यालय नविन ईमारात येऊन एकंदरीत ५ वर्ष झालेले आहेत ,

आपल्या अधिनिस्त तहसील कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 व 5 च्या १७ बाबीवरील माहिती तयार करुन ते प्रसिध्द करणे आवश्यक आहे त्याची तत्काळ अमलबजावणी करावे असे निवेदन सोबत शासन आदेश, प्रसिध्द करावयाची १७ बाबीची यादी सुद्धा नायब तहसिलदार श्री. ए. बी. भांडेकर यांना जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांनी दिले.