Home Breaking News *आरक्षणाचे जनक, थोर समासुधारक, बहुजनांचे कैवारी, रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज स्मृती...

*आरक्षणाचे जनक, थोर समासुधारक, बहुजनांचे कैवारी, रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज स्मृती दिन*

152

*आरक्षणाचे जनक, थोर समासुधारक, बहुजनांचे कैवारी, रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज स्मृती दिन*

छ्त्रपती राजर्षी शाहू हे महाराज हे कोल्हापूर संस्थानचे अधिपती, सामाजिक न्यायाचे अग्रदूत शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरविण्यासाठी शाहू महाराजांनी केलेले कार्य महान आहे. शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५० टक्के शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे हे भारतातील पहिले राज्यकर्ते ठरले.

याच सुमारास शाहू महाराजांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंड मधील उच्च शिक्षणासाठी त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्य निवारण परिषदात बाबासाहेबा बरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा खरा पुढारी मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला. मुंबई येथे त्यांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. त्यांच्या पूण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏🙏

Don`t copy text!