Home Breaking News *आरमोरी तालुक्यात हत्तीची धुमाकूळ : खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून नुकसान ग्रस्त...

*आरमोरी तालुक्यात हत्तीची धुमाकूळ : खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी*

143

*आरमोरी तालुक्यात हत्तीची धुमाकूळ : खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी*

 

गडचिरोली :: आरमोरी तालुक्यात मागील काही दिवसात हत्तीच्या धुमाकूळीमुळे मक्का पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हत्तीनीं संपूर्ण मक्का नष्ट केला आहे. याची माहिती मिळताच *गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे* यांनी कुरंझा, देलोडा (बुज) व देशपुर या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जावून नुकसान ग्रस्त सोलर पॅनल पंप व पिकांची पाहणी केली. सदर नुकसानीचे रीतसर वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सुचना खासदार डॉ. नामदेवजी कीरसान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेवून मका पिकाची लागवड केलेली होती. परंतु हत्तीच्या धुमाकुळीमुळे मोठी नुकसान शेतकऱ्याची झाली असून ही नुकसान भरपाई काढायची कशी व बँकेचे कर्जे कसे फेडायचे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यासाठी काँग्रेस कडून अनेक आंदोलणे करण्यांत आली परंतु शासन व प्रशासन या विषयी उदासीन दिसून येत आहे.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भूपेश कोलते, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली दिलीप घोडाम, ऋषीजी मानकर, मारुती तुमराम, किशोर जांभुळकर, किशोर उपरीकर, दिलीप आत्राम, यादव जांभुळकर, पुरुषोत्तम मगरे, पराग जांभुळकर, किशोर मसाखेत्री, डॉ. जांभुळकर, सौ.शितलताई मानकर, सौ.मंगला नागापूरे, सौ.समताताई जांभूळकर, सौ.पूर्णाताई जांभुळकर, सौ. प्रीतीताई जांभुळकर, सागर जांभुळकर सह नुकसान ग्रस्त शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Don`t copy text!