Home Breaking News सिमेंट कांक्रीटचा रस्ता व नाली बांधकाम करून द्या

सिमेंट कांक्रीटचा रस्ता व नाली बांधकाम करून द्या

84

सिमेंट कांक्रीटचा रस्ता व नाली बांधकाम करून द्या

 

मुख्याधिकारी नगरपरिषद, गडचिरोली यांना निवेदनातून मागणी

 

 

विषय :- सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सिमेंट कांक्रीटचा रस्ता व नाली बांधकाम करून देण्याबाबत.

 

संदर्भ :- आमचे विनंती अर्ज दिनांक २१/०८/२०२३

 

अर्जदार :- वार्ड क्र. १२, फ्रेन्ड्स कॉलनी, विदर्भ इंटरनॅशनल स्कूल, चंद्रपूर रोड, येथील रहवासी

 

 

 

उपरोक्त विषयान्वये सविनय विनंती याप्रमाणे की, आम्ही खालील सही करणारे नागरिक हे वार्ड क्र. १२, फ्रेन्ड्स कॉलनी, विदर्भ इंटरनॅशनल स्कूल जवळ, महिला महाविद्यालय रोड, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथाल रहिवासी आहोत. संदर्भिय अर्जान्वये सिमेंट कांक्रीटचा रस्ता व नालीचे बांधकाम करून मिळणेबाबत आपलेकडे अर्ज केला होता. त्या अर्जाच्या पूर्ततेबाबत व या भागातील रस्ता, नालीच्या समस्येचे निराकारण करणेकरीता, आपले कार्यालयाकडे वारंवार भेट देण्यात आली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आपले कार्यालयास भेट देतो, त्यावेळेस दरवर्षी आपलेकडून रस्ता व नालीच्या बांधकामाबाबत आश्वासन दिले जाते पण आश्वासन पूर्णत्वास येत नाही. आम्ही दरवर्षी मालमत्ता कर वेळेवर भरतो, तरी सुद्धा आमचे समस्येकडे लक्ष दिले जात नाही.

 

आमच्या रहिवासी भागात मजबूत रस्ता नाही व पावसाळ्यात रस्त्याच्या सखल भागात पाणी साचत असल्यामुळे ये-जा करण्यासाठी आम्हाला अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे व लहान मुलांना पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. आमचे भागात नाली नसल्याकारणाने सांडपाणी साचून आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. आमचे भागात सिमेंट कांक्रीटचा रस्ता व नाल्यांची अत्यंत आवश्यकता आहे. तरी सदर कामास मंजूरी देउन बांधकाम करून दिल्यास आमची ये-जा करण्याची व सांडपाण्याची समस्या दूर होईल. तरी आपल्यास, आम्हा सर्वांची नम्र विनंती आहे की, खालील काम प्रथम प्राधान्याने करून देण्याचे करावे.

 

कामाचे नाव :- सिमेंट कांक्रीटचा रस्ता व नाली श्री. सुनिल चावरे यांच्या घरापासून ते विदर्भइंटरनॅशनल स्कूलच्या संरक्षण भितीपर्यंत, रस्त्याची अंदाजे रुंदी ६ मीटर, रस्त्याची लांबी ८० मीटर

Don`t copy text!