Home Breaking News सामाजिक कार्याच्या भक्कम पायाचा गौरव; गडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार...

सामाजिक कार्याच्या भक्कम पायाचा गौरव; गडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार २०२६’ ने सन्मानित!

9

सामाजिक कार्याच्या भक्कम पायाचा गौरव; गडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार २०२६’ ने सन्मानित!

 

समाजहितासाठी अविरत कार्य करणारे सुरज गुंडमवार यांना संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील यांच्या हस्ते प्रधान

 

आश्रयआशा फाउंडेशन मालेगाव येथे भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन; प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

 

 

गडचिरोली: सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आश्रयआशा फाऊंडेशन, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार २०२६’ यंदा गडचिरोली येथील पत्रकार सुरज गुंडमवार यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील यांच्या हस्ते, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

समाजहितासाठी अविरत कार्य करत विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, वंचित घटकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे, प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वयाचा सेतू निर्माण करणे तसेच निर्भीड व लोकाभिमुख पत्रकारितेद्वारे लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

 

मालेगाव येथे आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा भव्य व दिमाखदार वातावरणात पार पडला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतापराव दिघावकर साहेब माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व लोकसेवा आयोग सदस्य, डॉ. अमोल शेजवळ लासलगाव, प्रा. सी.डी. रोटे सर निफाड‌, मा. संजय देशमुख देशमुख संस्थापक अध्यक्ष, साईधनवर्षा फाऊंडेशन, नाशिक तसेच जगन्नाथ पंडित बच्छाव गुरूजी कौळाणे (नि).आश्रयआशा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पवार

सचिव आशाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली संस्था सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय उपक्रम राबवत असून राज्यभरात कार्याचा विस्तार करत आहे. समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा संस्थेमार्फत सातत्याने जपली जात आहे.

 

राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार’ हा सन्मान सुरज गुंडमवार यांच्या प्रामाणिक, निर्भीड व लोकाभिमुख पत्रकारितेची अधिकृत पावती मानला जात असून गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

 

नक्षलग्रस्त व मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये अनेक वर्षांपासून पत्रकारिता व माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गरिब-गरजूंना हक्क मिळवून देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे व जनजागृती करणे या कार्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

 

सुरज गुंडमवार हे युवा मराठा न्यूज चे ब्युरो चीफ असून, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ,तसेच पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्यचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

 

त्यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल गडचिरोली जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Don`t copy text!