*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा चामोर्शीची कार्यकारिणी गठण संपन्न*
स्थळ : प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था, चामोर्शी | दिनांक : 11 जुलै 2025
*चामोर्शी (प्रसिद्धी प्रमुख)* – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा चामोर्शीची नवी कार्यकारिणी गठण सभा *दिनांक 11 जुलै 2025* रोजी *प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था, चामोर्शी* येथे उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीस तालुक्यातील अनेक शिक्षक, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. *कार्यकारिणी गठण प्रक्रियेचे संचालन* श्री. रमेश भाऊ रामटेके जिल्हा सरचिटणीस, श्री नरेंद्र कोत्तावार जिल्हा कार्याध्यक्ष, श्री. राजेश बाळराजे जिल्हा शिक्षक नेते, श्री. रवी मुलकलवार मार्गदर्शक, श्री. जे.बी.गेडाम मार्गदर्शक, श्री. रविंद्र वासेकर मार्गदर्शक, श्री. अनिल मार्तीवार मार्गदर्शक, श्री.राजेंद्र भुरसे तालुका अध्यक्ष गडचिरोली श्री. प्रवीण पोटवार अध्यक्ष जुनी पेंशन संघटना चामोर्शी यांचे प्रमुख उपस्थितीत शांततामय आणि लोकशाही मार्गाने पार पडले. *नविन कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व इतर विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या.*
कार्यकारिणीत पुढील सदस्यांची निवड करण्यात आली:
*अध्यक्ष* – श्री. संजय लोणारे
*सचिव* – श्री. जनार्धन गेडाम
*कार्याध्यक्ष* – श्री. अविनाश बारसगाडे
*कोषाध्यक्ष* – श्री. दीपंकर साना
*उपाध्यक्ष* – 1) श्री. नरेश जाम्पलवार
2) श्री. राजेश्वर कुंदावार
3) श्री. देवाजी तिम्मा
4) श्री. आशिष जयस्वाल
*सहसचिव* – श्री. मुरलीधर सातपुते
*कार्यालयीन प्रमुख* – श्री. उमेश जेंगठे
*प्रसिद्धी प्रमुख* – 1) श्री. राजेश्वर मुलकलवार
2) श्री. संजय पेंदोर
*युवा आघाडी* – 1) संतोष गुट्टे
2) निलेश मानापुरे
3) कवेश दंडीकवार
*विभागीय उपाध्यक्ष* – क्षोनिश बिस्वास, दिपक केंद्रे, जयंत समदार, रामदास नरोटे, माणिक वरपडे, किसन सोनुले, विनोद गंपावार, संदिप सडमेक, सुरेंद्र चणेकार, भारत वासकर,
*महिला आघाडी* – 1) सौ. वंदना गुरूणुले
2) सौ. कोमल साखरे
3) सौ. प्रणिता कोटगिरवार
4) सौ. अर्चना सेमस्कर
5) कु. प्रीति नवघडे
*उर्वरित पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच करण्याचे सर्वानुमते ठरले*
नवीन कार्यकारिणीने आपल्या भाषणात प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि शिक्षकांचे हक्क व हित जोपासण्यासाठी संघटनेतर्फे सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रदीप भुरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.जनार्धन गेडाम नवनियुक्त तालुका सरचिटणीस यांनी केले.
आज झालेली कार्यकारिणी निवड सभा यशस्वी होण्यासाठी श्री. राजेश बाळराजे जिल्हा शिक्षक नेते, श्री. पुरुषोत्तम पिपरे, तालुका अध्यक्ष शिक्षक समिती, श्री.संतोष लाजुरकर सचिव शिक्षक समिती, संजय लोणारे सर नवनियुक्त तालुका अध्यक्ष, श्री जनार्दन गेडाम सर नवनियुक्त सरचिटणीस श्री भास्कर शेंडे सर, श्री देवाजी तिमा सर ,श्री राजू मडावी सर ,श्री मनोहर केंद्रे सर, श्री.तुषार चांदेकर सर , यांनी विशेष प्रयत्न केले तसेच सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांचेविशेष सहकार्य लाभले.







