*अहेरीच्या मॉडेल शाळेत शिक्षकांची भरणा करावी*
विद्यार्थी पंचायत समिती गाठले!
*हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी विषय तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश केले*
*अहेरी:*_येथील पीएम श्री मॉडेल शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थी गुरुवार 17 जुलै रोजी अहेरी पंचायत समिती गाठले. वेळीच अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी संवर्ग संवर्ग विकास अधिकारी गणेश चव्हाण यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केले व तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची भरणा करण्याचे निर्देश दिले.
यावर येत्या दोन दिवसात शिक्षक पुरविण्याचे संवर्ग विकास अधिकारी चव्हाण यांनी आश्वासन दिले.
यावेळी सुरेंद्र अलोणे, महेश बेझंकीवार, कुरेशी मामू, संदीप आत्राम आदी व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.





