Home Breaking News *पेंढरी, गट्टा परिसरातील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,...

*पेंढरी, गट्टा परिसरातील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम यांच्या हस्ते स्वागत*

72

*पेंढरी, गट्टा परिसरातील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम यांच्या हस्ते स्वागत*

 

गडचिरोली ::

धानोरा तालुक्यात  पेंढरी, गट्टा व आसपासच्या गावांतील भाजपचे असंख्य पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

गडचिरोली येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि आरमोरीचे आमदार रामदासजी मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व नवोदित कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जोरदार स्वागत केले.

 

या कार्यक्रमात भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये अनेक निवडून आलेले सरपंच, ग्रामसभा अध्यक्ष, तरुण कार्यकर्ते आणि महिलांचा मोठा सहभाग होता. भाजपच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये विश्वास दाखवला.

 

राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यातील मूलभूत समस्या सुटत नाहीत. अनेक वेळा मागण्या करूनही त्यावर तोडगा निघत नाही. युवकांना रोजगार मिळत नाही, शेतकरी अडचणीत आहेत, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांचे ऐकले जात नसल्याची भावना व्यक्त करत अनेक युवक कार्यकर्त्यांनी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

 

या पक्षप्रवेश कार्यक्रमात विशेषत: परमेश्वर गावडे (सरपंच, दुर्गापूर), देवसाय गावडे (सरपंच, कामतडा), कांडेराम उसेंडी (सरपंच, झाडापापडा), माणिक हिचामी (ग्रामसभा अध्यक्ष, सावंगा), लक्ष्मण आतला, उत्तम आतला, अरविंद मडावी, हिरामण गावडे, अरविंद टेकाम, गणेश पोटावी, दिलीप जोरी, हरिदास गावडे, रमेश मडावी, विशाल नरोटे, मधुकर जाडे, देवू नरोटे, विजय गावडे, मोतीराम दरो, अजय पदा, विलास नरोटे, लालू टेकाम, गणेश गावडे, कुमारी हेमलता धुर्वे, पल्लवी गावडे, गीता गावडे, सपना मडावी, योगिता मडावी या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो भारतीय जनता पार्टीच्या युवक व महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.

 

“हे कार्यकर्ते काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून पक्षात दाखल झाले आहेत. आगामी काळात हे सर्व कार्यकर्ते काँग्रेस संघटनेला बळकट करत सामान्य जनतेसाठी संघर्ष करतील.” असा विश्वास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला.

 

या वेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरटी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, धानोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत कोराम, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन पा. नाट, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, , शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदुजी वाईलकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शंकरराव सालोटकर,  अनिल कोठारे, घनश्याम वाढई, प्रभाकर वासेकर, हरबाजी मोरे, जितेंद्र मूनघाटे, लालाजी सातपुते, दिवाकर निसार, प्रतिक बारसिंगे,  योगेंद्र झंझाड, श्रीनिवास ताटपल्लीवार, सुरेश भांडेकर, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सौ. कल्पना नंदेश्वर, सौ. कविता उराडे, सौ. पौर्णिमा भडके, सौ. शालिनी पेंदाम, जे.एम. मुप्पीडवार, सुदर्शन उंदीरवाडे, द्यानेश्वर पोरटे, उत्तम ठाकरे, सुधाकर ठाकूर, रवींद्र पाल, सुशील शाह, बालू चापले, नागोराव उईके, प्रभाकर कुबडे, भूषण भैसारे, विनोद निकुरे, मेंगाजी कोडाप, निकेश कामिडवार, विजय लाड, सुरज भोयर, मनोज बोरकर, अनिल किरमे, संजूभाऊ मेश्राम, देवा लोणबले,स्वप्नील बेहरे, जावेद खान यांच्यासह विविध काँग्रेस नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

नवोदित कार्यकर्त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे धानोरा तालुक्यात काँग्रेस अधिक मजबूत झाली आहे.

Don`t copy text!