*ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता*
*सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल करणार ध्वजारोहण*
गडचिरोली, दि. १३ ऑगस्ट (जिमाका): भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मुख्य शासकीय कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.





