मौजा येनापुर येथे घरफोडी करणा­या आरोपीस आष्टी पोलीसांनी केली अटक

97

 

मौजा येनापुर येथे घरफोडी करणा­या आरोपीस आष्टी पोलीसांनी केली अटक

 

चोरीस गेलेले सोने, 25,000/- रुपये रोख रक्कम, 02 मोबाईल फोन तसेच दूचाकी वाहन आरोपीकडून करण्यात आले हस्तगत

 

गडचिरोली जिल्ह्रात वाढत्या चोरीच्या व घरफोडीच्या गुन्ह्रांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने दि. 27/07/2025 मौजा येनापूर येथे घरफोडी करणा­या आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याची कारवाई आष्टी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

सविस्तर वृत्त असे आहे की, मौजा येनापूर येथील रहिवासी श्रीमती मायाबाई माधव अलचेट्टीवार ह्रा दिनांक 27/07/2025 रोजी सकाळी घराला कुलूप लाऊन शेतावर रोवण्याकरीता गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने घराचे कुलूप तोडून घराच्या आतमध्ये प्रवेश करुन कपाटामध्ये असलेले नगदी 15,000/- रुपये तसेच 40,000/- रुपये किंमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत तसेच फिर्यादीच्या घराशेजारी राहणारे फिर्यादीचे नातेवाईक श्री. विस्तारी नागन्ना मेकर्तीवार यांच्या देखील घराचे कुलूप तोडून टिनाच्या पेटीमध्ये ठेवलेले नगदी 10,000/- रुपये व 13,000/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन असा एकूण 78,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम अज्ञात आरोपीने चोरुन नेल्यावरुन पोलीस स्टेशन आष्टी येथे अप. क्र. 0191/2025 कलम 331 (3), 305 (अ) भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

सदर गुन्ह्यातील आरोपीने घटनास्थळावर कोणतेही पुरावे न सोडल्याने आरोपीचा शोध घेणे हे पोलीसांपुढे आव्हान होते. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात दोन वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस पथकांनी तांत्रीक पुराव्याच्या मदतीने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा अत्यंत शिताफिने शोध घेऊन आरोपी नामे निकेश देविदास मेश्राम, वय 28 वर्षे, रा. लखमापूर बोरी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली ह. मु. वंजारी मोहल्ला, गडचिरोली यास दिनांक 12/08/2025 रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल सोने, नगदी 25,000/- रुपये रक्कम व 02 मोबाईल तसेच मोटारसायकल जप्त करण्यात आली असून मा. न्यायालयाने आरोपीस 03 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. गोकुलदास मेश्राम हे करीत आहेत.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता), श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी श्री. अजय कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे आष्टीचे प्रभारी अधिकारी पोनि. विशाल काळे, पोउपनि. गोकुलदास मेश्राम, पोहवा./रतन रॉय, भाऊराव वनकर, पोअं/रविंद्र मेदाळे, संतोष श्रिमनवार यांनी पार पाडली.