गडचिरोली जि. प्र.वृत्तवानी न्यूज
गडचिरोली येथील गणेश नगर काल पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसल्याने जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले.
अर्धवट नाले बांधकाम व नाल्यावर झाकण नाही.पावसाचे पाणी रस्त्यावर व तिथून थेट लोकांच्या घरात त्यामुळे लोकांचे प्रचंड नुकसान रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी जलमय रस्ते व अशातच हृदयाला स्पर्श करणारी घटना गणेश नगर कॉलनी मध्ये घडली.काल रात्री पासून एक प्रेग्नेंट गाय पाण्यात अडकून उठून निघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.पण ती निघु शकत नव्हती.
कॉलनी मधील नागरिकांनी भर पावसात सुरक्षित स्थळी नेण्याचा
प्रयत्न केला.पण ते शक्य झाले नाही.नगर परिषद मध्ये माहिती देण्यात आली.नगर परिषद टीमने धावपळ करून JCB च्या साह्याने गाय सुरक्षितपणे उचलून ट्रॅक्टरमधून पुढील उपचारासाठी रवाना करून गायीला जीवदान दिले.ही जबाबदारी व तत्परता खरंच कौतुकास पात्र आहेत.अशीच अवस्था इतर बाबतीत दाखवले तर फार बरं होईल.आजच्या परिस्थितीत गणेश नगर परिसरात फारच बिकट स्थिती निर्माण झाली आहे.अर्धवट नाल्या बांधकाम त्यावरही झाकणे नाही.रस्त्यावर पाणीच पाणी जमा होत असल्याने लोकांना जाणे येणे मुश्किल झाले आहे.पावसाचे घाण पाणी बोरवेल मध्ये मिसळते.नळातून लाल पाणी येते .त्या दूषित पाण्यामुळे लोकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपरिषदने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
तात्काळ नागरिकांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अर्धवट नाल्यावर झाकणे लावणे गरजेचे आहे.अर्धवट नाल्या व त्यावर झाकणे नसल्याने लहान मुलांना व मुक्या प्राण्यांना त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे.रस्त्यावर पाणी जमा होणार नाही. व लोकांना जाणे येणे करण्यास मुश्किल होऊ नये याची सुद्धा काळजी नगरपरिषदने घेणे गरजेचे आहे.कचऱ्याची सुद्धा कठीण समस्या गंभीर आहे कधी घंटा गाडी वेळेवर येत नाही.आली तर कधी येते कधी निघून जाते ते माहित होत नाही.
अशा अनेक समस्याने गणेश नगर त्रस्त आहे.कधी लोकांचा रोष निर्माण होईल हे सांगता येत नाही.रोष निर्माण होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना नगरपरिषदने कराव्या अशी वॉर्डातील लोकांची तीव्र मागणी आहे.







