*प्रियांका च्या मृत्यूला जबाबदार कुंदोजवार कुटुंबाला कठोर सजा द्या*
*शिवसेना महिला आघाडीच्या ( शिंदे गट) छाया कुंभारे यांची मागणी ,अन्यथा तीव्र आंदोलन करणार*
*गडचिरोली* ..गडचिरोली येथील रहिवासी प्रियांका कात्रोजवर यांचे लग्न आष्टी येथील कुंदोजवार कुटुंबात झाले होते.परंतु लग्नाच्या काही दिवसां नंतर पती आणि कुटुंबातील सदस्यांनी प्रियांका ला त्रास देणे सुरू केले या बाबतची माहिती प्रियांकाच्या कुटुंबाला माहीत झाल्यावर पती आणि कुटुंबातील सदस्या ना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु कुटुंबातील सदस्य समजण्याच्या मनस्थितीत नव्हते. रक्षाबंधनाला प्रियंका गडचिरोली येथे भावाला राखी बांधण्या करिता आली. आणि १३ ऑगस्ट ला परत आष्टी ला गेली आणि १४ ऑगस्ट ला आष्टी येथे घरातच फाशी लागलेल्या अवस्थेत आढळली आज दिनांक १९ ऑगस्ट ला प्रियांकाच्या घरी गडचिरोली येथे शिवसेना महिला आघाडीच्या छाया ताई कुंभारे आणि पदाधिकाऱ्यांनी . भेट दिली असता प्रियांकाच्या कुटुंबातील आई वडिलांनी सांगितले की पती सासरे सासू हेच प्रियांकाच्या मृत्यूला जबाबदार आहेत .तरी प्रियांकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पती सासू सासरे आणि इतर सदस्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मा. एकनाथ जी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री.मा आशिष जयस्वाल साहेब . सह पालक मंत्री यांचे कडे शिवसेना महिला आघाडीच्या छाया ताई कुंभारे माजी उपतालुका प्रमुख ज्योत्स्ना राजुरकर माजी शाखा प्रमुख सीमा पराशर यांनी केली आहे जर प्रियांकाचे मारेकरी दोषी असलेले सासू सासरे व कुंदोजवार कुटुंबातील इतर सदस्यांना येत्या सात दिवसात अटक न केल्यास शिवसेना महिला आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या छाया ताई कुंभारे यांनी दिला आहे






