पत्नीचा ख्ून केल्या प्रकरणी जबाबदार आरोपी पतीस मा. न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
. मा. प्रमुख जिल्हा व न्यायाधीश गडचिरोली, श्री विनायक आर. जोशी यांचा न्यायनिर्णय
. जन्मठेपेसह 5000 रु. दंडाची शिक्षा; दंड न भरल्यास 06 महिने वाढीव शिक्षेची तरतुद
सविस्तर वृत्त असे की, मौजा जपतलाई (कोवानटोला) ता. धानोरा, जि. गडचिरोली येथिल रहीवासी परसराम धानुजी कुमरे वय 48 वर्ष याने त्याची पत्नी नामे मिराबाई परसराम कुमरे वय 37 वर्ष हिचे चारीत्र्यावर संशय घेवून तिच्या सोबत भांडण करुन दिनांक 04/10/2022 रोजी रात्री 01.00 वा. सुमारास खलबत्याच्या लोखंडी मुसळाने व चाकुने डोक्यावर वार करुन गंभीर दुखापत करुन तिचा खून केला होता. या प्रकरणी परसराम कुमरे याची बहिण नामे आशाबाई रावजी पोटावी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोस्टे धानोरा येथे दिनांक 04/10/2022 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील तपासी अधिकारी पोलीस मदत केंद्र येरकड येथील पोउपनि आकाश ठाकरे यांनी आरोपी परसराम धानुजी कुमरे वय 48 वर्ष यास दि. 04/10/2022 रोजी अटक करून, आरोपी विरूध्द सबळ पुरावा मिळून आल्याने तपास पूर्ण करून, मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर प्रकरणी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे खटला चालून फिर्यादी, पंच, साक्षीदाराचे बयान तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद मा. न्यायालयाने ग्राह्य धरून दिनांक 26/08/2025 रोजी मा. प्रमुख जिल्हा व न्यायाधीश गडचिरोली श्री. विनायक आर. जोशी यांनी आरोपी नामे परसराम धानुजी कुमरे वय 48 वर्ष रा. जपतलाई (कोवानटोला) ता. धानोरा, जि. गडचिरोली यास कलम 302 भादवी मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व 5,000/- रु दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास 6 महिने वाढीव कारावासाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.
सरकारी पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकिल श्री. सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहीले. तसेच गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक आकाश ठाकरे यांनी केला. संबंधीत प्रकरणात साक्षीदारांशी समन्वय साधून प्रकरणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी पोनि/चंद्रकांत वाबळे, श्रेणी पोउपनि शंकर चौधरी, श्रेणीपोउपनि भैयाजी जंगटे, मपोहवा जिजा कुसनाके, मपोहवा मिनाक्षी पोरेड्डीवार, पोशि जिवन कुमरे, मपोशि छाया शेट्टीवार यांनी कामकाज पाहीले.







