गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांना लंम्पी चा प्रादुर्भाव झाला आहे आणी प्रसार होत आहे याकडे जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात यासाठी चे निवेदन मा.जिल्हाधिकारी यांना दिले. मा.जिल्हाधिकारी यांनी याकडे तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश संबधितांना दिले तसेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी सुध्दा या बाबतीत लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील असे संबंधीत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांना आदेश दिले आहेत.या निवेदनात अशी जनावरांना विलगीकरण करून अलग ठेवणे,इतर जनावरांना लागण होऊ नये यासाठी उपाययोजना, लसीकरण ,जनावरांच्या नोंदणी क्रमांक नुसार जनावरांच्या मालकांना सुचीत करून खबरदारी घ्यावी यासाठी त्यांना पशुवैद्यकीय अधिकारी चे मदतीने जनावरांची काळजीपूर्वक निगा राखणे तसेच शहरातील मोकाट जनावरांना बंदिस्त करून विलगीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. यावेळी निवेदन देतांना गडचिरोली नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे,माजी आरोग्य सभापती चंद्रशेखर भडांगे, अँड. विजय चाटे,माजी नगरसेवक तुळशिराम शहारे, यासह अन्य उपस्थित होते.