मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा या शाळेला भेट

214

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा या शाळेला भेट

 

एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा या अतिदुर्गम शाळेला भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

 

या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी शाळेतील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय तसेच मध्यान्ह भोजन व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल, छंद व भविष्यातील उद्दिष्टांविषयी जाणून घेतले. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे प्रोत्साहन दिले.

 

यावेळी शिक्षकांसोबत बैठकीत अध्यापन पद्धती, शैक्षणिक निकाल, तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा झाली. शाळेतील स्वच्छता, शिस्त आणि परिसरातील हरित उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

 

गरजेप्रमाणे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शैक्षणिक वातावरण आणखी समृद्ध करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

 

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक,श्री. एम.सी.बेडकेशिक्षकवर्ग, श्री. टेकाम,श्री.नरोटे श्री. बोडगेलवार श्री. कवडो उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश मिळाला आहे.