*चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीला वेग : माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रयत्नांना यश*

63

*चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीला वेग : माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रयत्नांना यश*

 

गडचिरोली, दि. ०२ सप्टेंबर २०२५ :

चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुरुड गावाजवळील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खडे व खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. अपघाताचा धोका लक्षात घेता चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांनी ही बाब माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने पुढाकार घेत या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यात आला.

 

काल चामोर्शी दौऱ्यात मा.खा. डॉ. नेते यांनी स्वतः रस्त्यांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज दिनांक ०२ सप्टेंबर रोजी पावसामुळे अधिकच बिकट झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे देण्यात आले. त्यानंतर गिट्टी टाकणे, खडीकरण व खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

 

या तातडीच्या दुरुस्तीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. नागरिकांनी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या त्वरित सहकार्याबद्दल आभार मानले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे समाधान व्यक्त केले आहे.