*जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत समाजकल्याण विभागाचे 13 विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र*
गडचिरोली, दि. २ सप्टेंबर – आज झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत समाजकल्याण विभागाचे 13 विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले . समाजकल्याण विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज पब्लिक स्कूल, वांगेपल्ली (अहेरी) येथील तब्बल ९ विद्यार्थ्यांनी विजयी कामगिरी करून विभागीय कॅरम स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
अंडर 14 गटात अश्विन कुम्मरी, सुशांत अट्टेला, महेंद्र कावरे, कार्तिक दुर्गम आणि निशांत कुम्मरी यांनी उल्लेखनीय खेळ करत पुढील फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर अंडर 17 गटात प्रफुल दुर्गम, धम्मरत्न दुर्गे, महेंद्र गड्डी आणि ज्ञानेश्वर दुर्गे या चार खेळाडूंनी दमदार कामगिरी करून निवड मिळवली.
याशिवाय, राजमाता जिजाऊ पब्लिक स्कूल, सिरोंचा येथील विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. अंडर 14 गटात पूजा पोट्टाला, अंडर 17 गटात माधुरी कोटा तर अंडर 19 गटात शैलेजा गोमासी आणि विजयशांती जनगम हे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, छत्रपती शिवाजी महाराज पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक किशोर आंबूले, राजमाता जिजाऊ पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका डांगेवार तसेच अमित खोब्रागडे आणि श्री. पडेलवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.