*स्पंदन फाउंडेशन गडचिरोलीच्या वतीने शिक्षक दिन साजरा…*
वृत्तवानी न्यूज
गडचिरोली दि. ५ सप्टेंबर २०२५
गडचिरोली शहरातील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे स्पंदन फाउंडेशन गडचिरोली यांच्या वतीने शिक्षक दिन समारंभ उत्साह पुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती लाभली.
या प्रसंगी गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचा शाल, श्रीफळ व वृक्ष देऊन सन्मानकेला. . . यावेळी कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले,आज शिक्षक दिन असुन “शिक्षक दिन हा केवळ औपचारिक सोहळा नसून, समाजाच्या घडणीत शिक्षकांचे असलेले योगदान स्मरण करण्याचा दिवस आहे. दिवंगत राष्ट्रपती, तत्त्वज्ञ व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. स्पंदन फाउंडेशनने या निमित्ताने शिक्षकांचा गौरव केला ही बाब प्रशंसनीय आहे सर्व शिक्षकांना मी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.”असे प्रतिपादन मा.खा.डॉ. नेते यांनी व्यक्त केले.
*_स्पंदन फाउंडेशन – सेवाभावातून समाजोन्नती_*
स्पंदन फाउंडेशन ही गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या कार्यरत एक सेवाभावी संस्था म्हणून विशेष ओळखली जाते. प्रत्येक समाजघटकापर्यंत सेवा व सकारात्मक कार्य पोहोचवण्याचे ध्येय घेऊन संस्था कार्यरत आहे. शैक्षणिक प्रोत्साहन, सामाजिक बांधिलकी व विकासात्मक कामांमध्ये स्पंदन फाउंडेशन अग्रेसर असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने मंचावर माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री सौ. गिताताई हिंगे, प्राचार्य श्रीमती मानसी गगधानी (जळगाव), आमदार डॉ. नरोटे यांच्या पत्नी सौ. वैशालीताई नरोटे, लडके सर, ओबीसी नेते शेषराव येलेकर सर, कुणबी समाज नेते ताजने सर यांची उपस्थिती लाभली.
मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या शिक्षक, नागरिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिक्षक दिनाचा हा सोहळा अतिशय प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.