1) लॉईड्स स्पोर्ट्स अकादमी व्हॉलीबॉल संघ चॅम्पियन ट्रॉफीसह.
2) राज्यस्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या २० वर्षांखालील उंच उडी स्पर्धेत सुश्री मोनिका मडावी यांनी रौप्य पदक जिंकले.
*लॉईड्स स्पोर्ट्स अकादमीच्या प्रतिभेने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जिंकली व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप, अर्जित केले उंच उडी रौप्य पदक*
हेडरी :
लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन चा भाग असलेल्या लॉईड्स स्पोर्ट्स अकादमी (एलएसए) च्या सदस्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावून गडचिरोली जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उजळले आहे. गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एलएसए व्हॉलीबॉल संघाने चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आणि पुणे येथील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २० वर्षांखालील महिलांच्या उंच उडी स्पर्धेत प्रतिभावान खेळाडू सुश्री मोनिका मडावी यांनी रौप्य पदक जिंकले.
२ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर दरम्यान पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत, गडचिरोलीच्या प्रतिभावान खेळाडू आणि लॉईड्स स्पोर्ट्स अकादमीच्या प्रशिक्षणार्थी सुश्री मोनिका मडावी यांनी २० वर्षांखालील महिलांच्या उंच उडी स्पर्धेत १.४० मीटर उडी मारून रौप्य पदक जिंकले. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २,१०० खेळाडूंनी सहभाग घेतला.
या कामगिरीसह, सुश्री मोनिका मडावी १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान मध्य प्रदेशात होणाऱ्या पश्चिम विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा येथील अव्वल खेळाडू सहभागी होतील. तिची पात्रता गडचिरोलीच्या युवा क्रीडा प्रतिभेसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे.
रामनगर (गोंदिया) येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एलएसएच्या व्हॉलीबॉल संघाने अंतिम फेरीत २-० अश्या फरकाने विजेतेपद पटकाविले. एकूण १६ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. ही कामगिरी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यातील अकादमीची वाढती प्रतिष्ठा अधोरेखित करते.
लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “हे विजय गडचिरोलीसारख्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल प्रदेशातील क्रीडा प्रतिभेला वाव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत. आमचे उद्दिष्ट अॅथलेटिक्सपासून ते सांघिक खेळांपर्यंत जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तरुणांना संधी प्रदान करणे आहे.”
एलएसए स्थानिक तरुणांना प्रेरित करीत सक्षमीकरणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे, तसेच गडचिरोलीला महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख क्रीडा केंद्र म्हणून ओळख प्राप्त करून देत आहे.