Home Breaking News सण उत्सवाच्या काळातील शांततेसाठी गडचिरोली जिल्ह्रातील 77 सराईत गुन्हेगार हद्दपार

सण उत्सवाच्या काळातील शांततेसाठी गडचिरोली जिल्ह्रातील 77 सराईत गुन्हेगार हद्दपार

175

 

सण उत्सवाच्या काळातील शांततेसाठी गडचिरोली जिल्ह्रातील 77 सराईत गुन्हेगार हद्दपार

 

 

गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सण-उत्सवांच्या काळात जिल्ह्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांनी शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करावा यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडून योग्य ती खबरदारीची पाऊले उचलण्यात आलेली आहेत.

 

त्याअंतर्गत बी.एन.एस.एस. कलम 163 (2) अन्वये कायदा व सुव्यवस्था भंग करण्याची शक्यता असलेल्या 77 सराईत गुन्हेगारांना गडचिरोली जिल्ह्रातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये – पोस्टे कुरखेडा 05, वडसा 11, कोरची 03, गडचिरोली 09, आरमोरी 19, चामोर्शी 04, अहेरी 11, मुलचेरा 05, आष्टी 09 व उपपोस्टे रेपनपल्ली 01 अशा प्रकारे विविध पोस्टे व उपपोस्टे हद्दीतील एकूण 77 सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. या सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन, अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच समाजातील शांतता भंग करणारी कृत्ये इ. प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून, सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेस बाधा निर्माण होऊ नये या दृष्टीने सदर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नागरिकांना सुरक्षित व शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी करण्यात आलेली असून जिल्ह्रातील सर्व नागरिकांनी शांतता, बंधुता आणि सामाजिक सौहार्द राखून उत्सव साजरा करावा तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी केले आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टेचे सर्व प्रभारी अधिकारी यांनी केलेली आहे.

Don`t copy text!