*मंजूर झालेल्या 33 केव्ही सब-स्टेशनचे काम तातडीने सुरु करून पूर्ण करावे-कसमसूर क्षेत्रातील गावाकऱ्यांचे माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांना निवेदन.*
*सब स्टेशनचे काम लवकर पूर्ण होईल राजेंनी दिले आश्वासन.!*
*गडचिरोली:-* जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कसमसूर परिसरातील नागरिकांनी मंजूर झालेल्या 33 केव्ही सब-स्टेशनचे काम अद्याप सुरु न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत तातडीने काम सुरु करत पूर्ण करण्यात यावे,या मागणीसाठी माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांना निवेदन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून 33केव्ही सब-स्टेशनला मंजूरी मिळुनही प्रत्यक्ष काम सुरु झालेले नाही.त्यामुळे गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून कमी दाबाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अडचणी येत आहेत.तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण,घरगुती वापर आणि लघुउद्योगांनाही याचा मोठा फटका बसत आहे.त्यामुळे कसमसूर क्षेत्राच्या 70 गावांतील सर्वासामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
निवेदन स्वीकारताना माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व संबंधित वीज वितरण विभागाशी व गडचिरोलीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी तातडीने संपर्क साधून सब-स्टेशनचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू,असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
त्यावेळी कसमसूर ग्रामपंचायत सरपंच सौ.कमलताई हेडो,जवेली बुर्ज सरपंच कु.अलिशाताई गोटा,वाघेझरी सरपंच विलास कोंदामे,जवेली खुर्द सरपंच मुन्ना पुंगाटी,महादेव पदा उप सरपंच कोटमी,सरपंच सादु कोरामी,घोटसुर सरपंच सिंदू मोहोंदा,मानेवारा उपसरपंच देविदास मटामी,वेनहरा ईलाख सल्लागार प्रकाश पुंगाटी,ईलाखा सचिव राजू गोमाडी,विकास झोरे,पुसू गावडे,मैनू लेकामी,बेबी हेडो,बेबी कन्नलवार,दमाजी नारोटे,बाबुराव पुंगाटी,देऊ गावडे, गंगाराम इष्टाम ,सुधाकर गोटा,लालसू नरोटे तसेच ग्रामपंचायतचे व वेनहारा ईलाखा पदाधिकारी उपस्थित होते.!!