Home Breaking News  *गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा*.

 *गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा*.

101

*गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा*.

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली ची मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे मागणी*

*गडचिरोली जिल्ह्यातील विवीध प्रलंबित समस्या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर यांचे नैतृत्वात मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन,निवेदन देऊन चर्चा केली* दिनांक:-११/०९/२०२५ *प्रलंबित समस्या:-* ‌‌. ‌ ▪️१)जुलै २०२४ पासुन फेब्रुवारी २०२५ पर्यंत ८ महिन्याची १% घरभाडे भत्ता फरकाची थकबाकी रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. ▪️२) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचा लाभ तात्काळ देण्यात यावे. ▪️३) आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे आलेल्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ देण्यात यावे. ▪️४) वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या G.P.F. पावत्या त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावे. ▪️५) पदवीधर विषय शिक्षकांची रिक्त पदे(भाषा /गणित) सेवाज्येष्ठते नुसार त्वरीत भरण्यात यावे. ▪️६) न्यायालया द्वारे समायोजन झालेल्या व २०२५ मध्ये जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षकांना भारमुक्त्त करण्यात यावे. ▪️७) कोर्टाच्या निर्देशानानुसार १ जानेवारी २००६ ते ३१ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीतील उर्वरित शिक्षकांची १५% प्रोत्साहन भत्ता थकबाकीची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी‌. ▪️८) सेवा पुस्तिका अद्यावत करण्यासाठी तालुका स्तरावर कॅम्प लावण्यात संदर्भात मा.गटशिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात यावे. ▪️९) शासन निर्णय २ जून २०२५ नुसार प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतनातील त्रृटी दुर करुन वेतन निश्चिती करण्यात यावी. ▪️१०) ४% सादील अनुदान जिल्हा परिषद शाळांना त्वरीत अदा करण्यात यावे. ▪️११) प्राथमिक शिक्षकांची थकीत वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व थकीत बिले त्वरीत अदा करण्यात यावे. ▪️१२) सेवा निवृत्त शिक्षक श्री नुसरत मसुद शेख यांची एकस्तर वेतनाची वसुली व गट विमा निधी त्वरीत देण्यात यावे.यांसह इतरही मागण्यांचा समावेश निवेदनात होता. ▪️१३) B.L.O.सह इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढून घेण्यात यावे. ▪️१४) गडचिरोली जिल्ह्यातील पेसा व नाॉनपेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे मागील ५ महिन्यापासुन चे थकीत मानधन त्वरीत अदा करण्यात यावे. ▪️१५) श्री अभिषेक वामनराव लोखंडे (शिक्षण सेवक) पं.स.चामोर्शी यांना जिल्हा परिषद सेवेत नियमित करण्यात यावे. ▪️१६) सेवानिवृत्त शिक्षक श्री नुसरत मसुद शेख पं.स.कुरखेडा यांची एकस्तर वेतनाची वसुली व गट विमा निधी त्वरीत देण्यात यावे. 👉याप्रसंगी निवेदन देऊन चर्चा करतांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,जिल्हा सरचिटणीस अशोक रायसिडाम,जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिलमवार,जिल्हा उपाध्यक्ष श्री सुरेश वासलवार, गडचिरोली तालुकाध्यक्ष श्री धनेश कुकडे, तालुका सरचिटणीस श्री स़ंजय मडावी, कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री गौतम लांडगे, सरचिटणीस श्री प्रदिप ऊईके, सहसरचिटणीस श्री अनिल सहारे,वडसा तालुकाध्यक्ष श्री विठ्ठल नन्नावरे,गोपीनाथ सहारे, श्री राजविलास गायकवाड, श्री मरापे सर,आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी चर्चेत मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार यांनी सर्व प्रलंबित समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिलेले आहे. 👉तसेच वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या G.P.F.पावत्याचे काम जवळपास पुर्णत्वास आले असुन काही प्रमाणात पावत्या उपलब्ध होत आहेत. ८ दिवसात १००% G.P.F. पावत्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तसेच पात्र शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देणे,१% घरभाडे भत्ता फरकाची थकबाकी देणे, श्री अभिषेक वामनराव लोखंडे सर यांना जि.प.सेवेत नियमित करणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देणे,उर्वरित शिक्षकांची १५% प्रोत्साहन भत्ता थकबाकी त्वरीत अदा करणे या मागण्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन मा. शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिलेले आहे.

Don`t copy text!