धक्कादायक प्रकार कोरोनाची लस घ्यायला गेलेल्या तीन वृद्ध महिलाना दिली कुत्र्याची लस एका महिलेची तब्बेत बिघडली

1073

धक्कादायक प्रकार
कोरोनाची लस घ्यायला गेलेल्या तीन वृद्ध महिलाना दिली कुत्र्याची लस
एका महिलेची तब्बेत बिघडली

उत्तर प्रदेशमध्ये तीन वृद्ध महिला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिलाअ डोस घेण्याठी आरोग्य केंद्रात केले. पण तिथल्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी तीनही महिलांना चूकून अँटी रेबीजचे इंजेक्शन दिले. नंतर तीन महिलांपैकी एका महिलेची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात सरोज (70), अनारकली (72) आणि सत्यवती (62) या आज कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य केंद्रात गेल्या. तिथे आरोग्य कर्मचार्‍यांनी तिघींनी कुत्रा चावल्यानंतर दिली जाणारी अँटी रेबीजची लस दिली. तिघी जेव्हा घरी आल्या तेव्हा सरोज यांना चक्कर आली आणि जीव घाबरा झाला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिनही महिलांना जेव्हा लस दिली तेव्हा त्यांना एक चिठ्ठी देण्यात आली होती. त्यात अँटी रेबीजची लस दिल्याचे नमूद करण्यात आले. ही बाब जेव्हा तिघींच्या कुटुंबीयांना कळाली तेव्हा त्यांनी तातडीने आरोग्य केंद्रात धाव घेतली आणि संबंधित कर्मचार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.