*राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेलबिया पिकांवर १४ ऑक्टोबरला मार्गदर्शन*

32

*राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेलबिया पिकांवर १४ ऑक्टोबरला मार्गदर्शन*

 

 

गडचिरोली, (जिमाका) दि.13 ऑक्टोबर : कृषी विभाग अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया (NMEO-OS) सन २०२५-२६ यां वर्षी जिल्ह्यात नवीन अभियान सुरु होत असून सदर अभियान अंतर्गत रब्बी करडई, तीळ, जवस, मोहरी, भुईमुग इत्यादी तेलबिया पिकांचे महत्व पटवून त्याचे शेतकऱ्यांना व्यापक जनजागृती होईल व पर्यायाने त्याचा लाभ शेतकऱ्यांना व नागरिकांना होईल तसेच क्षेत्र, उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल पेरणीपासून ते काढणीपश्यात चे लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल या हेतूने दिनांक १४ आक्टोबर २०२५ रोजी वेळ सकाळी १०.३० स्थळ – सुमानंद सभागृह, आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित असून तेलबिया लागवड व काढणीपश्यात प्रक्रिया करणारे शेतकरी स्वत मार्गदर्शन करणार आहेत. तरी मोठ्या संख्येने महिला शेतकरी व शेतकरी यांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती प्रिती हिरळकर (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली) यांनी केले आहे.

 

योजनेचे उद्धिष्ट :

१. गळीतधान्य पिकांखालील सिंचित क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये वृद्धी करणे

२.कमी उत्पादकता असणाऱ्या पिकांखालील क्षेत्र गळीतधान्य पिकाखाली आणणे.

३. तृणधान्य/ कडधान्य पिकात आंतरपिकाद्वारे गळीतधान्य पिकांखालील क्षेत्रात वाढ

करणे.

४. भात पिकाच्या काढणी नंतर पडीक राहणाऱ्या क्षेत्रावर गळीतधान्य पिके घेऊन

क्षेत्र विस्तार करणे.

0000