अन्याय, अत्याचारा विरोधात गडचिरोलीत सर्वपक्षीय निदर्शने

35

अन्याय, अत्याचारा विरोधात गडचिरोलीत सर्वपक्षीय निदर्शने

गडचिरोलीः देशातील नागरिकावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज दुपारी येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.

विविध संघटनांचे कार्यकर्ते इंदिरा गांधी चौकात एकत्रित होवून त्यांनी आपल्या मागण्याबाबत व त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबाबत जोरदार नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आंदोलनकर्ते कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी यांची भेट घेवून त्यांना देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या नावाने लिहिलेले निवेदन सादर केले.

या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भुषण गवई यांचेवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, प्रसिध्द समाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची त्वरीत सुटका करण्यात यावी तथा लडाख ला ६ व्या अनुसूचित टाकण्याची त्यांची मागणी पूर्ण करण्यात यावी, आदिवासी जमिन हस्तांतरणाबाबत महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव त्वरीत रद्द करण्यात यावा, गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील नगर पंचायतींचे अध्यक्षपद अनुसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात यावा व आदिवासी समाजावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा या चार प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

या आंदोलनात प्रसिध्द आदिवासी कार्यकर्ते देवाजी तोफा, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कम्युनिस्ट पार्टीचे देवराव चवळे, बिआरएसपीचे मिलिंद बांबोळे, आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे माधव गावड, भारतीय बौध्द महासभेचे तुलाराम राऊत, प्रा. गौतम डांगे, अंनिसचे विलास निंबोरकर, रिपब्लिकन पक्षाचे हंसराज उंदिरवाडे, प्रा. प्रकाश दुधे, केशवराव सामृतवार, प्रदीप भैसारे, प्रल्हाद रायपुरे, एम्प्लाईज फेडरेशनचे भरत येरमे, सदानंद ताराम, गुरूदेव सेवा मंडळाचे सुखदेव वेठे, आदिवासी युवा कायकर्ते सोनू अलाम, रपिब्लिकन महिला आघाडीच्या सुरेखा बारसागडे, नीता सहारे, डॉ. अंकिता धाकडे, ज्योती उंदिरवाडे वनमाला झाडे, कल्पना रामटेके, विशाखा महिला मंडळाच्या सुमित्रा राऊत, ज्योती उराडे, मनिषा वारके, ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र रायपुरे, अशोक खोब्रागडे, सुखदेव वासनिक, सिद्धार्थ गोवर्धन,दादाजी धाकडे, युवा कार्यकर्ते राहूल मेश्राम, रोहीत गायकवाड, बंडू खोब्रागडे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले होते.