महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या मागणीला यश व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले
गडचिरोली शहरातील वाढत्या लोकसंख्या बघत स्थानिक गडचिरोली शहरातील आयटीआय चौक व मुख्य न्यायालयासमोर तात्काळ ट्राफिक सिग्नल बसवण्याची मागणी केली. गडचिरोली शहर हे जिल्हे मुख्यालय असून या शहरातून जाणारा महामार्ग हा जिल्ह्याचा एकमेव प्रमुख रस्ता आहे. या मार्गावरील आयटीआय चौक तसेच मुख्य न्यायालय समोर चा रस्ता हा दररोज होणाऱ्या अपघातांचा ब्लॅक स्पॉट ठरला आहे या भागात वाहतुकीची प्रचंड ताण असून चौकात ट्राफिक सिग्नल इतर नियंत्रण व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या जीवितस गंभीर धोका निर्माण झाला होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल भैया दुबाले गृह विभाग निराकरण समन्वय समिती सदस्य महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनात शहरातील आयटीआय चौक व मुख्य न्यायालय समोर ट्राफिक सिग्नल ची मागणी केली होती या मागणीला मान्य करत जिल्हा प्रशासनाने शरीरातील या दोन्हीही ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन ट्राफिक सिग्नल बसविण्यासाठी मान्यता दिली व या योजनेमुळे शहरातील वाढत्या वाहनतळामुळे निर्माण होणारी गर्दी कमी करून नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासाला नवीन दिशा मिळेल व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गडचिरोली जिल्हाध्यक्ष संदीप पे पेदापल्ली जिल्हा सचिव रोशन कवाडकर जिल्हा कार्याध्यक्ष सागर हजारे जिल्हा उपाध्यक्ष हारीस हकीम जिल्हा सह उपाध्यक्ष शुभम वानखेडे जिल्हा सहसचिव शहराध्यक्ष अनुराग कुर्ता वार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुरज गुंडमवार शहर सचिव मिथुन देवगडे तालुकाध्यक्ष राजकुमार महावे तालुका उपाध्यक्ष संतोष पडिहार तालुका सचिव राकेश बचलवार व तसेच प्रणय डाबरे अंशुल जैन या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व धन्यवाद व्यक्त केले.