दिनांक : १६ ऑक्टोबर २०२५
📍 ठिकाण : राजमाता राजकुवर बाई विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, तालुका एटापल्ली
जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी राजमाता राजकुवर बाई विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली येथे शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी तालुका एटापल्लीचे तालुका अध्यक्ष श्री. प्रसाद चंद्रशेखर पुल्लूरवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा . श्री शंकर गावडे .भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. यवन पुलके, तालुका शहर प्रमुख श्री. राकेश तेलकुंटलवार, तालुका सचिव श्री. शैलेश अकुलवार, तसेच प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रशांत मंडळ यांनी हजेरी लावली.
तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रा . श्री . प्रभू डोंगरवार सर, प्रा .श्री. तानाजी धोंगडे सर, शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि वार्ताहर वृंद श्री जनार्धन नल्लावार व महेंद्र सुलवावार उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या उपक्रमाद्वारे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सायकलच्या माध्यमातून सुलभ वाहतुकीची सुविधा मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासात यामुळे सोय आणि प्रेरणा मिळणार आहे.