*शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या — भाकपा व किसान सभाची मागणी*
**एटापल्ली | १६ ऑक्टोबर २०२५**
एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान पिक या हंगामात अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांच्या पोटावरच घाव बसला आहे. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे सर्व परिश्रम आणि गुंतवणूक वाया गेली आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने मदतीची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना, अद्यापही स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे व मदतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही, याबद्दल **भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा)** गडचिरोली जिल्हा कोन्सिल ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज भाकपा जिल्हा सचिव **कॉ. सचिन मोतकुरवार** यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार एटापल्ली यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अदा करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी एटापल्ली तालुक्यातही तात्काळ करण्यात यावी.”
कॉ. मोतकुरवार म्हणाले, “शेतकऱ्यांचे पिक नष्ट झाले, पण शासनाची यंत्रणा मात्र जागी होत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळाली पाहिजे. जर शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई दिली नाही, तर भाकपा रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल.”
या निवेदनावर शेतकरी व भाकपा कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत —
विनोद एच. पदा, बाजू जोहे, दिलीप मटाटामी, सततु पदा,नथु उसेंडी,रावजी मटाटामी,राजू मूलमा,बबन मटाटामी,इमला मटाटामी,तारा मटाटामी,कविता ऊसेंडी, राकेश मूळमा,दुलसा पदा
कॉ.सचिन मोतकुरवार ने स्पष्ट केलं की —
> “शेतकऱ्यांचा हक्क म्हणजेच आमचा संघर्ष. शासनाने जर हा निर्णय तातडीने लागू केला नाही, तर जनतेच्या हक्कासाठी लाल झेंडा पुन्हा रस्त्यावर उतरेल.”
—