रुग्णांसोबत साजरी झाली दिवाळी — “एक हात मदतीचा” टीमचा अनोखा उपक्रम

59

रुग्णांसोबत साजरी झाली दिवाळी — “एक हात मदतीचा” टीमचा अनोखा उपक्रम

 

दिवाळी म्हटलं की फटाके, चिवडा, चकल्या आणि आनंदाचे क्षण डोळ्यासमोर येतात. पण काहीजण असे असतात, ज्यांची तब्येत साथ देत नाही आणि ज्यांना सणाच्या दिवसांमध्येही रुग्णालयात राहावं लागतं.

 

अशा रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी “एक हात मदतीचा” ग्रुप दरवर्षी एक आगळा-वेगळा उपक्रम राबवतो. या उपक्रमात कुठल्याही प्रकारचे देणगी किंवा डोनेशन घेतले जात नाही — सर्व खर्च सदस्य स्वतःच्या योगदानातून करतात, ही विशेष बाब.

 

यावर्षी, २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे सर्व रुग्ण रुग्णांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

दिव्यांनी, फुलांनी आणि गोड पदार्थांनी सजलेले वातावरण क्षणभरासाठी रुग्णालय नव्हे, तर आनंदाचा उत्सव वाटत होता.

 

रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून प्रत्येक सदस्य भावुक झाला. एक रुग्ण म्हणाला —

 

“आम्ही घरी जाऊ शकलो नाही, पण ‘एक हात मदतीचा’ टीमने हॉस्पिटलमध्येच दिवाळी कशी साजरी करायची ते दाखवून दिलं.”

 

या उपक्रमासाठी उपस्थित होते —

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके मॅडम, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनीष मेश्राम सर, डॉ. धुर्वे सर, तसेच “एक हात मदतीचा” टीमचे सदस्य —

स्नेहल पद्मा दिलीप संतोषवार, जयेश देशमुख, शरद गिऱ्हेपुंजे, मंगेश मुनघाटे, रवी भंडांगे, मुकेश बरदाळकर , अबुल बंबोळे, संदीप मोटघरे, स्वप्नील श्यामकुवर, गोविंद भाऊ दिघोरे, पवन संतोषवार, विलास दिवटे भाऊ, आकाश चौधरी, साहिल बावणे, अक्षय इंगळे, सनी बारसागडे, लीलाधर हेटकर, विकास काबेवार, अमोल ककनालवर आणि अन्य सदस्य.

 

या प्रसंगी प्रमोद शेरकर सर व बालु येरोजवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी देणगी स्वरूपात थोडी मदत करून सामाजिक संवेदना व्यक्त केली.

 

दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे “आनंद वाटणे” — आणि “एक हात मदतीचा” टीमने तो अर्थ मनापासून जगून दाखवला. 💫