*27 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा*

182

*27 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा*

 

*प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांची राहणार प्रमुख उपस्थिती*

 

गडचिरोली :: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून, 27 ऑक्टोबर 2025 रोजी गडचिरोली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम यांच्यासह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

या सोहळ्याद्वारे काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी अधिकृतपणे प्रचार मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. या मेळाव्यात विविध पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

जिल्हा काँग्रेस कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जेष्ठ नेते तथा माजी जि.प. सदस्य रामभाऊ मेश्राम, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, रमेश चौधरी, नंदू कायरकर, नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर, नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, हरबाजी मोरे, दत्तात्रेय खरवडे, उत्तम ठाकरे, लालाजी सातपुते, विजय राऊत, श्रीनिवास ताडपल्लीवार, दिनेश सिडाम, देवाजी सोनटक्के, धिवरू मेश्राम, राकेश रत्नावार, परमेश्वर गावडे, सुधीर मडावी, लक्ष्मण आतला, सुरज मडावी, नागोराव ऊईके, संतोष भांडेकर, स्वप्नील बेहरे, विपुल येलटिवार, गौरव येनप्रेड्डीवार, सौं. कल्पनाताई नंदेश्वर व सौं. कविताताई उराडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.