बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी तर्फे आदिवासी जनचेतना महासंमेलन 15 व 16 नोव्हेंबर ला गडचिरोली येथे आयोजन
गडचिरोली -वृत्तवानी न्यूज
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी भारतीय आदिवासी परिषद,आदिवासी – दलीत एकता परिषद आयोजित जननायक बिरसा मुंडा यांच्या 150 वा जयंतीमहोत्सव व भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त आदिवासी जनचेतना महासंमेलन राजिव गांधी सभागृह, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे दिनांक 15 व 16 नोव्हेंबर 2025 रोजी
आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता बिरसा मुंडा,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन सकाळी 10ते12 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी 12ते 1वाजेपर्यंत भोजन अवकाश दुपारी 1वाजता उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक ॲड.सुरेश माने संस्थापक अध्यक्ष बी.आर. एस.पी.मुख्य अतिथी मा.संभाजी सरकुंडे तसेच मा.खोब्रागडे साहेब यांचे शुभहस्ते होणार आहे.तसेच दिनांक 16नोव्हेंबर रोजी सकाळी 9-30 ते 11 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम 11वाजता बिरसा व भारतीय संविधान अभिवादन रॅली दुपारी 12ते 2 वाजेपर्यंत जाहीर चर्चासत्र
विषय – आदिवासी दलीत संघर्ष -राजकारण व भविष्य दुपारी 2-15 वाजता भोजन अवकाश व दुपारी 3 वाजता प्रबोधनपर व्याख्यान सायंकाळी 4वाजता समारोपीय समारंभ सायंकाळी 6-30 वाजता आभारप्रदर्शन
Home Breaking News बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी तर्फे आदिवासी जनचेतना महासंमेलन 15 व 16 नोव्हेंबर...




