राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, गडचिरोलीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
गडचिरोली – वृत्तवानी न्यूज
आपल्या समाजात अनेक रुग्णांना तात्काळ रक्ताची गरज भासते.त्यावेळी रक्त वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना वनवन भटकावे लागते.पण त्यावेळी वेळेवर उपचारासाठी रक्त उपलब्ध होत नाही.त्यामुळे वेळप्रसंगी रक्ताअभावी रुग्ण दगावतो त्यामुळे या गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी रक्तदान – जीवदान या पवित्र कार्यात सहभागी व्हावे म्हणून रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था शाहूनगर गडचिरोली द्वारा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 13/09/2025 रोज गुरुवारी वेळ दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गाणली समाज सभागृह, शिवानी पेट्रोल पंप समोरआरमोरी रोड गडचिरोली येथेकरण्यात आलेले आहे.तरी या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे आव्हान आयोजकांनी केलेले आहे.





