केंद्रीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन 2025 मौजा कसनसूर येथे उत्साहात संपन्न
कसनसूर –
पंचायत समिती एटापल्ली तालुक्यातील कसनसूर केंद्राचे दोन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धा 12 ते 13 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात उद्घाटन समारंभ संपन्न झाले.
शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती श्रीमती कमलताई हेडो सरपंच ग्रामपंचायत कार्यालय कसनसूर, सहउद्घाटक श्रीमती बबिता मडावी,माजी सभापती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राकेश कोपूलवार सभापती शालेय व्यवस्थापन समिती तसेच विशेष अतिथी कैलास बेले सहाय्यक पोलिस निरीक्षक कसनसूर,विलास कोंदामी, वनिता गोटा,गीता उसेंडी,नीलिमा गोटा,संध्या कन्नलवार, सुनिल मडावी माजी सरपंच , घीसा मडावी, रावजी मडावी, कुळेयेटी सर,गुरुदास मडावी ग्रामविकास अधिकारी,भूपेंद्र सर, मदनकर सर, मयुर गोहने अभियंता महावितरण, रामा गावडे, बारसू उसेंडी, ,राजू लेंनगरे दुर्गा मोहरले,उमेश नरोटे,मोतीराम उसेंडी,मनोज गोटा,रमेश पोटावी,प्रमोद बरवा व सर्व सदस्य उपस्थित होते.केंद्र सामन्याचे आयोजक केंद्रप्रमुख डॉ.प्रभाकर साखरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.प्रभाकर साखरे,यांनी केले तर उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पदवीधर शिक्षक शिरीष ईरावार यांनी केले सामन्याचे समालोचन सचिन वाकडे,रोशन कुलसंगे यांनी केले. तर केंद्र कसनसूर चे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांचे सहकार्य लाभले.




