Home Breaking News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजसेवी संस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजसेवी संस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

111

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजसेवी संस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन.

 

34 रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी.

गडचिरोली

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था शाहुनगर गडचिरोली कडून दि. 13/11/2025 ला गानली समाज सभागृह गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री. संजय सराटे, कार्यकारी अभियंता, प्रशासन, महावितरण, मंडळ गडचिरोली,

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. हितेश पारेख, कार्यकारी अभियंता, महावितरण, विभाग गडचिरोली

तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. नितीन संगिडवार, अध्यक्ष, अखिल भारतीय गांनली समाज संघटना जिल्हा गडचिरोली, सौ. ममताताई कोतपल्लीवार, सदस्या, गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ, गडचिरोली हे उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिरात 34 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. गडचिरोली जिल्हा रक्तपेढीत मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजसेवी संस्थेकडून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. रविन्द्र आयतुलवार, प्रास्ताविक श्री. रंजन बल्लमवार, आभारप्रदर्शन श्री. आतिफ खान यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. रंजन बल्लमवार, श्री. सुधीर नकटुजी चौधरी, श्री. अविदास सावसाकडे, श्री. आतिफ खान, श्री. रविन्द्र आयतुलवार, श्री. स्नेहल संतोषवार, श्री. दिनेश खारकर, श्री. निकेश निकुरे, श्री.सुधीर योगाजी चौधरी सौ. सोनीताई संगीडवार, सौ. स्मिता बल्लमवार, श्री. रोशन गुरूकार, श्री. विवेक परचाके, श्री. धनराज अहीरकर यांनी प्रयत्न केले.

Don`t copy text!