Home Breaking News *सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समिती कार्यरत; उमेदवारांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था*

*सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समिती कार्यरत; उमेदवारांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था*

51

*सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समिती कार्यरत; उमेदवारांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था*

 

गडचिरोली, (जिमाका) दि.14 नोव्हेंबर :

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम–२०२५ जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होत आहेत. निवडणूक प्रक्रियेतील नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख दि. १७ नोव्हेंबर २०२५ असल्याने उमेदवारांची गर्दी अधिक वाढली आहे.

 

उमेदवारांची कोणतीही गैरसोय होऊ नये, अर्जांची पडताळणी सुरळीत पार पाडावी आणि सर्व पात्र अर्जदारांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी विशेष निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. १५ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) आणि दि. १६ नोव्हेंबर २०२५ (रविवार) या सुट्टीच्या दिवशीदेखील कार्यालय उघडे ठेवण्यात येणार आहे.

 

मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांनी निवडणूक कार्यक्रमातील संधीचा लाभ घेऊन, आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ समितीकडे अर्ज दाखल करावेत, असे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.

 

0000

Don`t copy text!