अखेर दुभाजकावर लावलेल्या झाडांना लागले कठडे
चामोर्शी:-
शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर आठवडाभरापूर्वी वृक्ष लागवड केली होती मात्र कठविण्या झाडे बेवारस जनावरांचे खाद्य होऊन मूळ उद्देशाला हरताळ फासल्याचे चित्र दिसताच प्रसार माध्यमांनी बातमी प्रकाशित करून संबधित विभागाचे लक्ष वेधले.त्याची दखल घेत नवीन झाडे व झाडांना कठडे लावण्यात आल्याने दुभाजकांचा लूक बदलून गेल्याचे दिसत आहे.
‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत
गडचिरोलीला सर्वाधिक हरित बनविणे हा उद्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी कोनसरी येथे आले होते त्यावेळी जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीचा प्रारंभ केला होता त्यानुसार नुकतेच चामोर्शी येथील राष्ट्रीय महामार्गावर लावलेली झाडे शेळ्या, बकऱ्या फस्त करत असल्यामुळे कठडे नियोजनाअभावी चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता वर्तवली गेली मात्र संबधित विभागाने झाडे सुरक्षित ठेवण्यासाठी कठडे लावले आहेत.
गडचिरोलीला सर्वाधिक हरित बनविने घनदाट जंगलामुळे ‘महाराष्ट्राचे फुफ्फुस’ अशी गडचिरोलीची राज्यात ओळख आहे, पण आता जिल्हा देशातील सर्वाधिक हरित व वनाच्छादित बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै रोजी जिल्ह्यातील कोनसरी आले असता त्यावेळी व्यक्त केला. होता ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील एक कोटी वृक्ष लागवडीचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २२ जुलैला जिह्यात करण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी वृक्ष लागवड केली होती . आता १० कोटी वृक्ष लागवडीपासून पुढे २५ कोटी वृक्ष लागवडीपर्यंतचा टप्पा राज्य सरकारने निश्चित केला असल्याचे सांगत
आगामी काळात लॉयड्स जेएसडब्ल्यू जेएसडब्ल्यू यांना प्रत्येकी २५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे त्यानुसार वृक्ष लागवड नुकतीच चामोर्शी येथील शहरात असलेल्या राष्ट्रीय मार्ग दुभाजकावर वृक्ष लागवड केली आणि झाडे सुरक्षित ठेवण्यासाठी
झाडाभोवती कठडे लावण्यात आले आहेत. दुभाजकाच्या मध्ये झाडे लावल्यानंतर त्या झाडांना संरक्षण कठडे लावण्यात आले नव्हते .कठडे लावण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी मागणी लावून धरली होती .हे विशेष त्यामुळे झाडा सभोवती कठडे लावण्याचे काम शहरात सुरू आहे .





