गडचिरोलीत सर्व वार्डात घरकुल योजना राबविण्याच्या प्रणोती निंबोरकरांचा निर्धार”

36

गडचिरोलीत सर्व वार्डात घरकुल योजना राबविण्याच्या प्रणोती निंबोरकरांचा निर्धार”

 

दिं 26/11/2025

 

गडचिरोली :गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक पाऊल उचलण्याचे आश्वासन देत नगराध्यक्षपदाची उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

“शहरातील उर्वरित घरकुल योजना प्रत्येक वार्डात राबवून कोणतेही कुटुंब बेघर राहू देणार नाही,” अशी हमी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली.

 

निंबोरकर यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या घरकुल योजनांना नवा वेग देणे हे त्यांचे प्राधान्य असेल. शहरातील सर्व वार्डांना समान न्याय देत पारदर्शक आणि जलद गतीने कामकाज राबवण्याची त्यांची बांधिलकी आहे.

 

त्यांनी पुढे सांगितले, “गरिबांचे घरकुल हे फक्त स्वप्न राहू नये. नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास, प्रत्येक पात्र कुटुंबाला आपले स्वतःचे घर मिळावे यासाठी आम्ही ठोस धोरण आखू.”

 

नागरिकांच्या मूलभूत गरजा, पायाभूत सुविधा आणि सुसंगत शहर नियोजनाबाबतही त्या सकारात्मक दृष्टीकोन मांडताना दिसल्या. त्यांच्या या आश्वासनामुळे शहरातील सर्व स्तरातील नागरिकांमध्ये उत्सुकता व आशावाद निर्माण झाला आहे.

 

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी ही घोषणा नव्या बदलाची नांदी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.