_*मेंडकी येथे संविधान दिनानिमित्त “छळ” नाटकाचे भव्य आयोजन*_

40

_*मेंडकी येथे संविधान दिनानिमित्त “छळ” नाटकाचे भव्य आयोजन*_

 

_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन*_

 

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी :

_ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे भारतीय बहुउद्देशीय बौध्द समाज, मातोश्री रमाबाई महिला मंडळ तथा समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने “छळ” या तीन अंकी नाटकाचे भव्य आयोजन करण्यात आले. नाटकाचे उद्घाटन सुरेशभाऊ चौधरी (म. फुले कला महाविद्यालय, देऊळगाव) यांच्या हस्ते पार पडले. *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर होते.*_

_सहउद्घाटक म्हणून इंजि. मोहनजी नंदेश्वर (ब्रह्मपुरी), उपाध्यक्ष म्हणून थानेश्वरजी कायरकर (मा. प. स. सदस्य, ब्रम्हपुरी) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलन सोहळ्यात रंजितजी कसारे (तांत्रिक अधिकारी, प. स. ब्रम्हपुरी), सौ. भावनाताई ईरपाते (मा. जि. प. सदस्य, चंद्रपूर) आणि यशवंतजी आंबोरकर (सं. कृ. उ. बा. स., ब्रम्हपुरी) यांनी सहभाग घेतला. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये सौ. मंगलाताई लोनबले (मा. सरपंच, मेंडकी), सौ. मंगलाताई ईरपाते (सरपंच, मेंडकी), झगडेदासजी रामटेके (सर, ब्रम्हपुरी), सुधाकरजी महाडोरे (ग्रा. पं. सदस्य, मेंडकी), राजेंद्रजी आंबोरकर (ग्रा. पं. सदस्य, मेंडकी), चिंतामनजी जेल्लेवार (ग्रा. पं. सदस्य, मेंडकी), कुंदाताई कोरेवार (ग्रा. पं. सदस्या, मेंडकी), माणिकजी ढवळे (अध्यक्ष, ता. मु. मेंडकी), बालाजी चहांदे (नवेगाव), विनायकजी पाकमाडे (मा. अध्यक्ष, स. सा. मेंडकी), शेंडे (वनरक्षक, मेंडकी), दुर्योधनजी चौधरी, सुयोगजी किनाके (राऊंड ऑफिसर, मेंडकी), रजनिताई भोयर (मा. ता. मु. अध्यक्षा, मेंडकी), भोयरताई मॅडम (मेंडकी), नितीनजी रामटेके आणि जनबंधु सर (सा. वि. फु. शा., मेंडकी) यांचा समावेश होता. कार्यक्रमाला इतरही अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली._

_उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले, “संविधान दिन हा आपल्या लोकशाहीची ताकद आणि नागरिकांच्या हक्क-कर्तव्यांची जाणीव करणारा दिवस आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला समानता, स्वातंत्र्य आणि न्याय मिळण्याचा अधिकार दिला आहे. आपल्या ग्रामीण भागात अशा सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सामाजिक मूल्यांची जपणूक होते, लोकांमध्ये एकोपा आणि सौहार्द वाढते.”_

_भारतीय बहुउद्देशीय बौध्द समाज, मातोश्री रमाबाई महिला मंडळ कलाकारांनी सादर केलेल्या “छळ” या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कलाकारांच्या अभिनयाने आणि कथानकाने वातावरण भारून गेले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले._