गडचिरोली नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी-शिवसेना युती कडे द्या
विकासाची जबाबदारी मी घेतो : आ. डॉ. आत्राम यांचे प्रतिपादन
गडचिरोली नगरपालीकेची सत्ता राष्ट्रवादी -शिवसेना युती कडे द्या, विकासाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली येथे ठिकठिकाणी आयोजित प्रचार सभेत केले.
गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक वनपट्ट्या पासून वंचित आहेत. अनेकांच्या नावावर त्यांचे प्रॉपर्टी कार्ड झालेले नाहीत. राष्ट्रवादी शिवसेना
युती सत्तेवर आल्याबरोबर हा महत्वाचा प्रश्न आम्ही तात्काळ निकाली काढू. शहरात एकही भव्य सभागृह नाही. रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही.
वॉर्डावॉर्डात अनेक समस्या कायम आहेत. या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी शिवसेना युतीच्या पदाच्या उमेदवार राष्ट्रवादी अध्यक्ष अश्विनी रवींद्र नैताम (खोब्रागडे) यांना तसेच नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या युतीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन आ. डॉ. आत्राम यांनी केले.
यावेळी विविध सभेमध्ये उमेदवार अश्विनी नैताम, प्रा. राजेश कात्रटवार, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश महिला उपाध्यक्षा गीता हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, सुनिल डोगरा, बबलू हकीम, अमोल कुळमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.
धर्मरावबाबांनी मांडला गडचिरोलीत ठाण
आ. डॉ. धर्मरावबाबा यांनी २५ नोव्हेंबर पासून गडचिरोली जिल्ह्यात ठाण मांडला असून देसाईगंज, आरमोरी नगरपालिका क्षेत्रात वॉर्डावॉर्डात कॉर्नर सभा, नागरिकांच्या भेटी घेतल्यानंतर २७ नोव्हेंबर पासून ते गडचिरोली शहर पिंजून काढत आहेत. शहरातील गोकुळ नगर, बसेरा कॉलनी, चनकईनगर यासह प्रत्येक वॉर्डात व नागरिकांच्या भेटी घेऊन राष्ट्रवादी-शिवसेना युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आ. डॉ. आत्राम करीत आहेत.





