*”हिंद-की-चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा*
गडचिरोली दि ३: “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाचा नुकताच आढावा घेण्यात आला.
सदर बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे यांच्यासह तहसिलदार (आस्थापना) श्री. सचिन जयस्वाल, श्री. लालसिंग खालसा, श्री. गोवर्धन सुरजमल चव्हाण, श्री. सुनील सिंग पटवा, श्री. अजयसिंग पटवा, श्री. विनोद यदुराव बनोत, श्री. सलानंदसिंग डि. डांगी, श्री. कतारसिंग मेंडसिंग डांगी, श्री. गोपाळ देवजी साबळे, श्री. जितेंद्र बी. सहला, श्री. अमरसिंग एस. गेडाम, श्री. विवेक नाकाडे, आणि श्री. राजासिंग बरियासिंग डांगी आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये विविध महत्त्वाच्या मुद्यांवर कार्यवाही निश्चित करण्यात आली. यामध्ये दिनांक ०७ डिसेंबर २०२५ ला नागपूरमधील कार्याक्रमामध्ये अन्नदान व सेवा देण्याबद्दल सहकार्य करण्याचे ठरले. तसेच, वडसा येथे होणाऱ्या ३५० व्या शहिदी समागम दिनानिमित्त श्री. गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या रथ आगमनाच्या आयोजनावर चर्चा करण्यात आली. गडचिरोली येथे दि. ०४ डिसेंबर २०२५ ला होणाऱ्या रथ आगमनाचे नियोजन व कार्यवाही करण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी (प्राथ.), पोलीस आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
याव्यतिरिक्त, नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी गडचिरोली येथून नागपूरला जाणाऱ्या प्रतिनिधींच्या सुविधांच्या व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, श्री. गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या महान कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे तसेच गडचिरोली येथील रथ आगमनाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे ताफा व्यवस्थापनावर चर्चा व कार्यवाही करण्यात आली.




