*_नवेगाव रै येथे जय शिवराय क्रिडा मंडळतर्फे भव्य डे-नाईट कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न…_*

53

*_नवेगाव रै येथे जय शिवराय क्रिडा मंडळतर्फे भव्य डे-नाईट कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न…_*

दि.०६ डिसेंबर २०२५( चामोर्शी)

चामोर्शी तालुक्यातील मौजा- नवेगाव रै | जय शिवराय क्रिडा मंडळ, नवेगाव रै यांच्या सौजन्याने आयोजित भव्य डे-नाईट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फित कापून संपन्न झाले.

 

उद्घाटनानंतर मा.खा. डॉ. नेते यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करत त्यांना उत्तुंग खेळभावना, शिस्त आणि संघभावनेने खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाला सरपंच डंबाजी खोडवे, पं.स. माजी सभापती वर्षा भांडेकर, पं.स. माजी उपाध्यक्ष बंडुजी चिळंगे, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद बुरांडे, ग्रा.प. सदस्य श्रीनिकांत सातपुते, सुनिल दुधबळे, मंडळाचे अध्यक्ष सानिध्य सातपुते, चेतन भांडेकर, ऋतुराज कोहळे, निखिल हजारे, हिमांशु उडान तसेच गावातील मान्यवर, नागरिक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

डे-नाईट ही कबड्डी स्पर्धा तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण क्रीडा संस्कृतीला नवचैतन्य देणारी ठरली.