हादरला संपूर्ण परिसर… लोकांची पळापळ… अनेकांचा मृत्यू, भीषण आगीत सर्वकाही उद्ध्वस्त
मध्यरात्री गोव्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण नाईट क्लब जळून खाक झाला, त्यात एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे पोलिसांनी निश्चित केलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः देखील मृतांच्या संख्येची पुष्टी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, मृतांमध्ये बहुतेक किचनमधील कामगार होते, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, मृतांमध्ये तीन ते चार पर्यटकांचाही समावेश आहे.




